Most Recent

Join with us

Seo Services
बंजारा समाजाच्या उपजाती
बंजारा समाजाच्या उपजाती
बंजारा तत्सम जाती
बंजारा एक जात नाही तर एक जमात आहे.जमात म्हणजे टोळक्यांनी राहणारा समाज आपल्याकडे व्यवसायावरुन जातीचे नाव पडते. बंजारा म्हणजे बनडा (व्यापर) करणारा बंजारा असे नाव लदणी आणि व्यापार करणारा एका गोट नामक वंशाच्या जमातीला देण्यात आले आहे. देशात व्यापार करणाऱ्या अन्य कित्येक जमाती आहेत. त्यांना बंजारा नाव पडले नाही. याचा अर्थ जे लदेणी नामक व्यवसाय आणिा छोटा मोठा फिरस्ता व्यापार करीत होते.आणि टोळी करुन तांडा नामक वस्ती करुन राहत होते तेच बंजारे त्यात काही टांडयांनी मिठाची (लवण म्हणेजे मीठ) लेदणी केल्या त्यांना लमाणी नाव पडले हे टांडे जेव्हा आंध्र,कर्नाटकात गेले तेलगु भाषेच्या उच्चारणामुळे लमाणी लंबाडा लंबाडी असे नाव पडले.तात्पर्य गोटवंशीय गोरमाटी मुख्यता देशात बंजारा लंबाटा मुख्य नावांनी ओळखले जातात.याचे मुळ स्थान सिंधु घाटी परिसर आहे.त्यापैकी महत्वाच्या ७ उपजाती आढळुन येतात.त्या खालील प्रमाणे.
कलावंत तत्सम जमातीः-
बंजारा भारतीय जमात आहे. देशातील बावीस प्रांतात ती एकवीस नावानी ओळखली जाते.आज ही देशात आपली भाषा वेशभूषा आणि संस्कृती जतन करुन जगत असल्यामुळे बंजारा संस्कृती-भाषा असी स्वतंत्र ओळख या जमातीची आहे.अलिकडेच साहित्य अकादमीने बंजारा भाषा आणि संस्कृतीली मान्यता दिली आहे.त्यामुळे पुन्हा बंजारा जमातीची नव्याने साहित्य आणि समाजात ओळख हेाईल.
सामान्यतः-
ढाढी, ढालीया, सनार,जोगी,शिंगाडा, नाव्ही बंजारा टांडा एक व्यवसाय आहे.त्या व्यवस्थेच्या प्रमुखाला नामक म्हणतात.आपल्या टांडयातील लोकांच्या अडीअडचणी दुर करणे टांडयांच्या गरजा पूर्ण करणे हे नायकांचे कर्तव्य त्याच प्रमाणेआवश्यक ते पोटी काही कलावंत,कलाकौशल्य असलेल्या तत्सम जातीचा एक तरी कुंटुब टांडयात असे प्रसंगी त्यांच्या कुंटुबांचा सांभाळण्याची जबाबदारी सुध्दा टांडयाचा नायक घेत असे.
१) ढाढी-
प्रत्येक टांडयात एक तरी ढाढी कुटुंब असे. एकीकडे तो किंगरी नावाचे वाद्य वाजऊन मनेारंजनासोबत सर्व बंजारा गोटा वंशाचा इतिहास मौखीक रुपाने सांगत असे.ढाढी आपल्याला पृथ्वीराज चव्हाणच्या दरबारातील कवी चंदभाटचे वंशज मानतात. राजस्थान मध्ये ढाढी नावाची एक जमात आहे. जाटो रेगरेा असे गोत्र असुन करमणुक करीत ते उदरनिर्वाह करीत फिरतात.
पुर्वीच्या काळी दरबारी गवय्या म्हणुन मोगल दरबारामध्ये ढाढी कुटुंबाचा सन्मान करुन त्याला मुस्लीम आणि हिन्दु धर्माचे संस्कार त्यांच्या मध्ये होते.अलिकडे ते पूर्णतः हिन्दुधर्मीय -ााले आहेत. महाराष्ट्राचे रामसिंग भगवान या जमाती पैकी असुन त्यांना पद्मश्री सन्मानाने केंन्द्र शासनानी सन्मानित केले हेाते. त्याच प्रमाणे के.एल.नाईक बंजारा संस्कृतीचे अभ्यासक याच जमाती पैकी होते.त्यांनी ढाढी समाजाची गोत्रावळी असी दिली आहे.१.ताजनाथ २. पोचला ३. डूकरेात ४. रत्ना ५. शेरा ६. रुधा ७. बाजी ८. सग्रावत ९. भग्नावत १०. रामदास ११. भिमला १२. देहावत, तर काही गोत्र सांगतात (१) सेरावत (२) उधावत (३) बाजावत (४) दुधावत (५) भाट (६) भानावत (७) रत्नावत.
बारा गोत्रः- (१) गाजू (२) गंद्रा (३) ताजु (४) पेाषला (५) देआना (६) धोला
(७) भाषा (८) सगणावत (९) झाडफोड (१०) झापडी (११) कंडेरिया
(१२) कापडी, के.एल.नाईक.
२. ढाढीयाः-
हब ढालीया कुटुंब टांडयांचा सेवक म्हणुनच ओळखला जातो. टांडयातील जन्म मृत्यू असो की सण त्योहार असेा त्यांचे कुटुंब टांडयाची सेवक म्हणुन बारीक सारीक कामे त्याला करावी लागत. तसेच सण त्योहार प्रसंगी उपडे वाजऊन करमणुक करणे बंजारा स्त्रीयांच्या नृत्याला उपडे वाजऊन साथे देणे एक प्रकारे सांगकामे करणारा म्हणजे ढाढी,सकाळ संध्याकाळी प्रत्येकांच्या घरी जाऊन भाकर मागुण त्याला खावे लागते. त्याचे पूर्ण पालन पोषण करण्याची जबाबदारी टांडा पार पाडीत असतेा.
३.सनारः-
ही एक कलावंत कारागीर करणारी जमात आहे. बंजारा समाजाची दागिण्यामुळे देखील ओळखली जाते कारण इतर समाजाच्या पेक्षा बंजारा समाजाच्या स्त्रियाचे दागिने देखील आपली विशेष ओळख दाखवितात. अन्य सोनाराला बंजारा स्त्रीयांचे दागिने तयार करता येत नाही. त्यांच्या मध्ये मुंडावरे, रुनवाल, माळवे, माळवी, सकवान,आडाणे,मोहरे, मांडवे, अशी अडनावे आहेत.
तसेच काही भागात लोकांनी सोनार असे उल्लेख केले आहेत पण मुळात ते बंजारा सनार आहेत.
बंजारा सनार हे कलाकुसर करीत असल्याने त्यंानी नागरी वस्तीत आपले स्थान बनविले त्यामुळे व्यवसायानुसार ते ताडयात न राहता जेथे व्यवसाय होवु शकतो त्याठिकाणी ते स्थायीक झाल्याचे आढळुन येते.
४.नाव्हीः-
नावीच मुळ पुरुष वासी असे मानतात. स्त्रीया प्रमाणे बंजारा पुरुषाला डोक्यावरील केशभुषा करण्याची आवड होती. त्यावेळी नाव्ही त्यांची पारंपारीक केस रचना ठेवण्याचा प्रयत्न करीत. बंजारा लोकांचे केस विशिष्ठ पध्दतीने कापून केशभुषा हे नाव्ही करीत असे त्याला झलपा देखील म्हणत असत. केस (कटींग) ठेवण्याची एक पध्दत चार-दोन तांडे मिळुन नाव्ही कुटुंब टांडयासोबत ठेवत असे नाव्हीचे आडनाव व गोत्र पुढील प्रमाणे राठोड,चव्हाण,पवार,नाईक,टांडयात एकाचे घर असते. भारतात तसेच राज्यात त्यांचे स्वतंत्र असे तांडे पण असल्याचे दिसुन येते.
५.जोगीः-
तांडयात धार्मीक वातावरण निर्माण करणे तर कधी कधी जडी-बुटी देऊन बंजारा समाजाच्या समाजाच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे. शकुन बघणे (समळ घालणे) पाणी भारुन देण्याचे काम, भुत-भादाची भिती कमी करण्याचे काम जोगी परिवार करीत असे. खानदेश,मध्यप्रदेशात आपल्या नावा समोर दस नामी गोसावी प्रमाणे गिरी, पुरी, भारती, बावा आडनावे जोगी लोक लावत असतात. जोगी समाजाचे लोक पुर्वी पीठ मागण्यासाठी झोळी घेऊन टांडयात फिरत असत.परंतु कालातंराने समाजात शेक्षणीक सुविधा तसेच परिवर्तन झाल्यामुळे सध्या जोगी व्यक्ती पीठ वगैरे मागतांना दिसुन येत नाहीत.
६. शिंगाडाः-
पुर्वी च्या काळी युध्द मोठयाप्रमाणात होत असत युध्दाच्या वेळी शिंगाडा नामक वाद्य वाजऊन योध्दांना प्रोत्साहन देण्याचे काम करणारे शिंगाडा बंजारा म्हणुन ओळखले जातात. त्यांची आडनावे गायकवाड, कांबळे,बनसोडे, अशी असतात. तर त्यांच्या स्त्रिया बंजारा स्त्रीयांची वेशभुषा करीत नाहित.पण बंजारा भाषा बोलतात. सण त्योहार जमातीच्या नावासमोर बंजारा ना लावतात. जसे ढाढी बंजारा भाषेत फारसे अंतर नाही. पण मुळ बंजारा गोरमाटी मध्ये बेटी व्यवहार होत नाही. अलिकडे होत आहेत. ही चांगली घटना आहे.
७.लमाणः-
बंजारा तत्सम व्यवसाय करणारी लमाण एक जमात आहे. गुरेढोरे पाळणे लदेणी करणे यांचा पण व्यवसाय होता.लदेणी बंद झाल्यानंतर शेळी व्यवसायाकडे ही जमात वळली. ही जमात पूर्णता शाकाहारी, माळकरी आहे.बंजारा भाषेची मिळती जुळती यांची भाषा आणि वेशभुषा पण आहे.हे बंजारा टांडा पासुन वेगळा टांडा करुन राहतात.
कुळवंशः- (१) पेळया (२) साबळया (३) चोपडया (४) खडया (५) पडवाळ (६) रवरवार (७) खेसराडा (८) अलावत (९) मोगर (१०) तिर्तया (११) धेती (१२) तर्गया (१३) बडदावक (१४) बरसर (१५) कछोटया (१६) लपुश्या (१७) खसरीया (१८) कलहटया (१९) अगडया, स्वतःला मथुरा लभाण पण समजतात.
८.लमाणाची उपजातः-
कोळी एकेकाळी एका कुटुंबाचा चमरा लोकांची संबंध आला असावा, त्या कुटुंबानी लग्न कार्यात लभाणा नवरदेवाला जोडे आणुन दिले म्हणून त्याला चंभरा लमाण व्यवसायावरुन नाव पडले असावे.मुळ लमाणाची अलीकडे रेाटी-बेटी व्यवहार होत नाहीत,यांचे कुळगोत्र असे आहेत. (१) जाडुवा (२) नाव्या (३) भेलका (४) डंगा (५) मस्या (६) चानोर (७) भेड्डा (८) मेडकर (९) गांगुर्डे (१०) येरवाळ (११) दहिवाळ (१२) बीडवाळ (१३) भोंडे (१४) ढमाण (१५) जोतीपाळ (१६) कटार (१७) चुनभुरव (१८) गवाई (१९) जामण्या इत्यादी आंध्रप्रदेश मध्ये सुगाली तर उत्तर भारतात मारु बंजारा , बामणिचा बंजारा भाट बंजारा नट बंजारा बाजीगर बंजारा , कांगसी बंजारा , शीख बंजारा , मुस्लीम बंजारा, लदेणिया बंजारा, सिरकी बंजारा बाकदिया बंजारा , राणा रजपुत लबाणा अशी वेगवेगळी नावे पहावयास मिळतात.

GOAR WEB CONSULTANT Monday, December 31, 2018
बंजारा तिज विषयी जाणुन घ्या..

बंजारा तिज विषयी जाणुन घ्या...

तीज उत्सव म्हणजे बंजारा स्त्र्यियांचा व मुलीचा आवडता उत्सव होय पावसाळयातील श्रावण महिना साजरा करण्यात येतो . पूर्वी पावसाळयात “लदेणी” होत नव्हती. बंजारा समाज एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर या काळात लग्नकार्य करीत असत. लदेणी काळात दोन तांडे पावसाळयानंतर विखुरल्या गेले की, पुन्हा भेटीची शक्यता फारच कमी असायची. तेव्हा आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिन्यात लग्न झालेल्या मुली माहेरी येत असत. या वेळी हा “तिज” उत्सव साजरा करण्यात येतो. लग्न झालेल्या मुलींना दुःख होई. या दुःखाचा विसर पडावा म्हणून “तिज” उत्सव साजरा करीत.
तीज उत्सव हा प्रामुख्याने तांडयातील मुलींचा मानला जातो. या उत्सवात स्त्रिया नाचगाण्यात भाग घेतात. असे असले तरी लग्नास योग्य किंवा उपवर मुलींचा गट या उत्सवाप्रसंगी प्रभावी ठरतो. श्रावण महिना लागताच बंजारा तरुणी रानोमाळ विविध लोकगीते गायला सुरुवात करतात. मनातला आनंद व्यक्त करण्यासाठी उत्साहाने सतत गायिल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे तांडया-तांडयांत वेगळे वातावरण निर्माण होते. नाचगाणे हा बंजारा स्त्रियांचा जीवनधर्म आहे. तीज उत्सव हा अविवाहित मुलींचा सर्वांत प्रिय उत्सव आहे.
आदिवासी समाजात असे दिसून येते की, कोणताही उत्सव आपल्या समूहाच्या प्रमुख नायकाच्या परवानगीशिवाय साजरा केला जात नाही. बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा समूह नायकाच्या घरी जमा होतो. नायका समोर तीज उत्सव साजरा करण्याविषयी प्रस्ताव मांडतात, लाडीगोडी लावतात. गीत गात नाचतात. मुलींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नायक तत्कालीन परिस्थितीचा विचार करतो. तांडयातील रोगराईची माहिती मिळवतो. तसेच कारभारी आणि तांडयातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्लाही घेतो. सल्लामसलत -ााल्यानंतर तांडा नायक तीज उत्सवाला तांडयाचा नायक या नात्याने मंजुरी देतो.
तीज उत्सवाला नायकाने परवानगी दिल्यानंतर तरुणींच्या मनातला आनंद व्दिगगुणित होतो. नाचगाण्याचे फेर धरत नृत्याला रंग चढत असताना तांडयातील स्त्रिया अविवाहित मुलींना पुढे करुन तीजनृत्यात सामील होऊन नाचगाण्याला सुरुवात करतात. त्यासुध्दा मागे राहत नाहीत. अविरत नृत्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यातील अंधाऱ्या रात्री तांडा गीत-नृत्याच्या तालासुराने गजबजून जातो.

“तीज” उत्सव साजरा करण्याची परंपरा राजस्थानी, मारवाडी, गुजराथी इत्यादी जातीजमातींत मोठया प्रमाणात असली तरी बंजारा समाज तीज उत्सव आपल्या पध्दतीने साजरा करतात.
तीज उत्सव साजरा करण्याचा दिवस नायकाने निश्चित केल्यानंतर श्रावण महिन्यातील नायकाने ठरविलेल्या दिवसापासून नऊ किंवा अकरा दिवसांत साजरा करायचा असतो. त्यामुळे तिजेच्या संबंधित आवश्यक असणाऱ्या वस्तूंची जमवाजमव केली जाते. सर्वप्रथम अविवाहित मुलीसाठी गहू पेरण्यासाठी बंाबूची दुरडी आणली जाते. जर घरात अविवाहित मुलगी नसेल तर नातेवाईकांच्या मुलीसाठी दुरडी आणली जाते आणि तशी सूचनाही दिली जाते. दुरडी आणल्यानंतर त्या दुरडीला लोकरीच्या धाग्यांचे गोंडे तयार करुन सुशोभित केली जाते.

तीज पेरण्याच्या ठरलेल्या आदल्या दिवशी सायंकाळी तांडयातील सर्व मुली एकत्र जमतात आणि नृत्य करीत नायकाच्या घरी जातात. नायकाची बायको गहू पाण्यात भिजू घालताना मुलींसोबत नृत्य करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीज पेरायची असते. तेव्हा शिवारातील वारुळमाती आणण्यासाठी जातात. जाताना अनेक गीते गातात. वारुळाची माती बहुतेक बोराच्या झाडाखाली तयार होते. या मातीने गव्हाचे रोपटे वेगाने वाढते. ही माती जमा करण्यापूर्वी मुली हरभऱ्याचे भिजवलेले दाणे बोरीच्या काटयात खोवतात आणि झाडाला प्रदक्षिणा घालतात याला “बोर झुडेर” असा शब्दप्रयोग बंजारा बोलीभाषेत आहे. या प्रसंगी पारंपारिक गीते गातात.
या माती आणण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पुढेपुढे मुलांचाही एक गट असतो. मुलेही मुलींसोबत स्पर्धा करतात. मुलींना गूढ कोडयात अडकवतात. ज्या मुलींचा विवाह पुढच्या वर्षी होणार आहे, अशा मुली तीज पेरल्यानंतर तांडा सोडून जातील म्हणून त्यांना अधिक मान असतो. मुले मुलींच्या रस्त्यात आडकाठी आणतात. मुली बोराच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालतात. म्हणून मुलींचा पहिला नवरा बोरांचे झाड म्हणून चिडवितात. या वेळी लोक तरुण मुलांना पाठिंबा देतात आणि मुले मुलींना पारंपारिक कोडयात अडकवतात. ते कोडे खालील प्रमाणे :-
मुलगा (कोडे):- “वाट बांधू घाट बांधू बांदी चारी देसा, पगे पगेमा
दामळीं बांधू जाईस कुळंसे देसा?”
भावार्थः- मी तुझी वाट बांधली, घाट बांधली,चार दिशाही बांधल्या.
एवढेच नाही तर तुझे पायही बांधले. मग तू कोणत्या
दिशेला जाशील?
मुलगीः- “घाट छोडू, वाट छोडू, छोडू चारी देसा
झारी सदा बेडलो छोडू, जाऊ बापुरे देसा”
भावार्थः- तू बांधलेली वाट, घाट, चार दिशा मी सोडवते. पाण्याचे
भांडयावर भांडे असलेले (कळशी,घागर) झारी सोडवून
मी मा-या बापाच्या देशाला जाते.
अशा प्रकारे मुले मुलींना आणखी गूढ कोडयात
अडकविण्याचा प्रयत्न करतात.
मुलगा (कोडे):- “छो हातेर दोल्डी ये बार हातेर आगेल्डी
ये वातेर आरत केद पच पेरे दियू ओल्डी”
भावार्थः- सहा हातांची दोल्डी (दुरडी) बारा हातांची आगेल्डी
म्हणजे काय? या गोष्टीचे उत्तर दिल्यावरच मी तुला
दुरडीत तीज (गहू) पेरु देईन.
अशा कोडयाचे उत्तर मुली काव्यरुपाने सोडवितात. जर कोडयाचे उत्तर सांगता आले नाही तर मुली गाण्यातून मुलांना विनवणी करतात. त्या मुली मुलांच्या संमती शिवाय मुली पुढे जावु शकत नाहीत. कोडे सोडवले नाही तर
-ााडासाठी आणलेले पाणी सर्व मुलींना सांडावे लागते परत पाणी भरुन आणवे लागते त्यानंतर खऱ्या तीज उत्सवाला प्रारंभ होतो. माती घेऊन आलेल्या मुली नायकाच्या घरी येतात. माती आपल्या दुरडीत टाकून नायकाच्या बायकोने भिजू घातलेले गहू पेरतात. या बरोबर पळसाच्या पानांचे द्रोण करुन त्यात माती भरुन त्यातही गहू पेरतात. या प्रसंगी नायकाच्या घरासमोर नाचगाणे होते. या तीज उत्सवाप्रसंगी ज्या कुटुंबात मुलगी नसते त्या कुटुंबात उत्सवाकरिता जवळच्या नातेवाईकांची मुलगी आणली जाते. तिची दुरडी पेरतात. तील पेरल्यानंतर मुली उत्साही होतात. गाणे म्हणायला सुरुवात होते. रात्रभर नृत्य करुनही मुलींना थकवा जाणवत नाही.
त्या नंतर तीज पेरलेल्या दुरडीमधील रोपांसाठी सकाळी व संध्याकाळी नियमितपणे पाणी शिंपडतात. हे त्यांचे नित्यकर्म होऊन जाते. पाणी आणण्यासाठी मुलींच्या झुंडी नदी, नाला किंवा विहिरीवर जातात. जाता-येताना गाणी गातात. यावेळी मुले मुलींची वाट अडवतात. मुला-मुलींमध्ये सवाल-जवाब होतो. याचा आनंद तांडयातील लोक घेतात. ते काही सवाल-जबाब पुढीलप्रमाणे.
मुलगा (सवाल):-“काळो कुंडो कचन भरो हेल्दा रुंदी वाट, कुंवारी छोरी
कुकर पकडू तारो हात”
भावार्थः- पाण्याचा काळा डोह भरुन वाहातो आहे. पाणी भरण्याची
वाट अरुंद आहे. तू विवाहित (कुंवारी) आहेस, तुझा हात
कसा धरु सांग?
मुलगी(जबाब):- “हास घालू हासली, खेचन बांधू आटी भरे सभामां लाथ
मारु, म जातेरी बेटी”
भावार्थः- मी गळयात हासली (गळयात अलंकार) घातली आहे.
डोक्यावर आटी (दागिना) मजबूत बांधीन, भरलेल्या सभेत
लाथ मारीन, मी खानदानी जातीची मुलगी आहे.
तू माझा हात कसा धरतोस?
मुलगा (सवाल):- “डगमग डागळो गोरी राके खेत
मुठीभर हुल्डा दये तारो घणोच पाकीये खेत.”
भावार्थः- शेतातला राखण करावयाचा मांडव डगमग करतो आहे.
तू शेताची राखण करतेस, तू मला मूठभर हुरडा दे!
हुरडा दिला तर तु-या जीवनाचे शेत भरुन येईल, भरपूर
पीक होईल.
मुलगी(जबाब):- “काचो सरा कचकच लागे, नख लागे जीव जाय
घरदणी कोनी खादो, परदेशी कुं खाय”
भावार्थः- कणीस कच्चे आहे. हुरडा भरलेला नाही. नाजूक आहे.
नख लागले तर जीव जाईल, घरधन्यानेच खाल्ला नाही
तर परदेशी कसा खाईल?
अशा प्रकारे मुली पाणी आणताना सवाल-जबाब करतातःगाणे म्हणतात आणि दुरडीत पेरलेल्या “तीज” ला सामूहिकपणे पाणी घालताना गाणे म्हणतात. ही तीज (पेरलेली दुरडी) पवित्र ठिकाणी ठेवल्या जाते. तिचा सांभाळही केला जातो.
बंजारा समाजात असा लोकविश्वास आहे की, जेवढया जोमाने रोपटयाची वाढ होते, तवढयाच जोमाने तांडयाची भरभराट होते, समृध्दी नांदते. म्हणून अविवाहित मुली “तिज”चा सांभाळ करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत त्या रोपटयावर विघ्न येऊ देत नाहीत. हा मुलींच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. मुली तीजचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून त्यांच्याविषयी गीतातून मनःकामना व्यक्त करतात.
या उत्सवाच्या कालावधीत उंच उंच झोपाळे बांधून, झोपाळयावर अनेक धार्मिक कथा-गीते गायिली जातात. मग रात्रंदिवस नृत्यगायनाला रंग चढतो. तीज विसर्जनारच्या अगोदरच्या दिवशी “ढंबोळी”चा कार्यक्रम असतो. या दिवशी सर्वांनी गोडधोड करुन “तिज”ला नैवेद्य दाखवून पूजा करायची असते. ढंबोळी हा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला मुटकुळयासारखा पदार्थ “तिज”ला अर्पण करतात. तसेच या दिवशी मुली उपवास करतात आणि आपल्या बाहेरगावच्या मैत्रिणींना बोलावून जेवण देतात.
त्यानंतर सायंकाळी सर्व मुली एकत्र जमतात आणि चिखलाच्या दोन मूर्ती तयार करतात. याला “गणगोर” असे म्हणतात. मोठी मूर्ती महादेवाची असते, तर लहान मूर्ती पार्वतीची असते. या गणगोरींची स्थापना करुन मुली त्यांची मनोभावे नारळ फोडून, गुळाचा प्रसाद दाखवून पूजा करतात आणि हा नारळ व गुळाचा प्रसाद मुली घरोघरी वाटतात. यालाच “ढंबोळी” असे म्हणतात.
रात्री आपसांतील लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. घरातील सर्व मंडळी जेवणापूर्वी तिजेला नमस्कार करतात. आमंत्रित असलेली व्यक्ती तिजेला पैसे व मुलीला शक्य असल्यास कपडे आहेर करते. मुली जेवणानंतर गणगोरजवळ नृत्याचा फेर धरतात, गातात.
या प्रसंगी तांडयातील नायक प्रमुख मुलाची निवड करतो. तसेच मुलींमधून एका मुलीची निवड केली जाते. यात प्रमुख मुलाच्या गटातील एक सवंगडी एका हातात गवताचा “दोना” (द्रोण) घेऊन मुलींच्या मध्यभागी उभा होतो व हा गवताचा “दोना” मुलींनी मिळवायचा असतो. मुली त्याच्याभोवती फेर धरुन नाचतात, गातात. मुलेही मुलींना गाण्यातून चिडवतात. शेवटी मुली गोंधळ घालून “दोना” हस्तगत करतात. तसेच शेवटी एक तरुण पाटी घेऊन उभा राहतो. ही पाटीही मुलींना हस्तगत करावयाची असते. रात्रभर मुले-मुली (खेळून) थकून जातात आणि ही पाटी हस्तगत करतात. या पाटीला “पिडीया” असे म्हणतात. अशा प्रकारे नृत्य-गायन, खेळात दिवस उजाडण्याची वेळ येऊन ठेपते. तो दिवस म्हणजे तीज विसर्जनाचा दिवस असतो.
या दिवशी मुली आपापल्या तिजेची दुरडी घेऊन घरोघरी फिरतात नृत्य करतात. शेवटी संपूर्ण तांडा नायकाच्या घरासमोर जमा होतो. त्या नंतर सर्वात मोठी असलेली मुलगी आपल्या तिजेची दुरडी नायकासमोर ठेवते. नायक त्या तिजेच्या दुरडीला नमस्कार करतो. एक-दोन रुपये आहेर ठेवतो आणि भारावलेल्या मनाने “आवो तीज तोडा” “या तीज (गहू) खुडू” असे म्हणतो. नायक तीज तोडून इतरांना भेट देतो व आपल्या पगडीमध्ये तिजेचा (गहूचा)तुरा खोवतो. त्यानंतर सर्वांना तीज तोडायला अनुमती मिळते.सर्व मुली आपआपली तिज खुडतात आणि इतरांना भेट म्हणून देतात. ती तिज कोणी आपल्या गळयात, कोणी आपल्या हातात बांधतात.त्यानंतर तीज विसर्जनासाठी तांडयातील लोक नदीकडे निघतात, तेव्हा मुली (तीज) आपली मैत्रीण चालली म्हणून रडतात व तिला निरोप देताना गाणी गातात.
या प्रमाणे भरावलेल्या मनाने तांडयातील सर्व लोक नदीवर येतात. “तीज” ची दुरडी आणि “गणगोर” यांना नदीच्या प्रवाहात विसर्जित करतात. मुली मोठमोठयाने रडतात. स्त्रिया आपल्या ओढणीचा पदर हातात घेऊन पदराने निरोप देतात. तीज नदीच्या प्रवाहात दूरदूर जात असते. त्या प्रसंगी निरोप देतांना
वेती जा ये वेती जा ।
जा मारी सातण वेता जा ।।
झाडीन देखन याढी केस ।
दातण देखण सातण जा।।
वेती जा मारी सातण वेती जा ।
अशी प्रकाचरे गीत म्हटले जाते. अशा प्रकारे तीजोत्सवाचा शेवट केला जातो.हा लेख लिहतांना प्रा. सुनिल राठोड सर, दर्यापुर अमरावती यांच्या पुस्तकाचा मला भरपुर आधार मिळाला आहे.
डॉ.एम.बी.

GOAR WEB CONSULTANT
बंजारा – बोली भाषेचा सामान्य परिचय
बंजारा – बोली भाषेचा सामान्य परिचय
भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते. भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात.ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते. भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा, गोत्र हे एकसारखेच आहे. बंजारा आजही आपल्या विभिन्न प्रांतात असलेल्या आपल्या जातभाईंना आपल्या मातृ बोलीत बंजारा/गोरमाटी भाषेत बोलतात. विशीष्ट वेषभुषा, केशभुषा त्याची आपली ओळख करुन देणारी आजही काही प्रांतांमध्ये सुरक्षित आहे. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आजही गोत्राच्या आधारेच लग्नसंबंध जुळवीण्यात येतात अशी ही एकमात्र बंजारा जात भारतीय जमात आहे.
आपल्या देशात सामान्यतः कोणत्याप्रकारचे धंदा-व्यवसाय करतात या आधारावर जात कोणती आहे हे ठरते होते. बनज करणारा बंजारी त्यात लवन (मीठ) व्यापार करणारे लभान, लंबाडा अशा व्यावसायिक नावाने ही जमात ओळखली जाते. वास्तविकतः बंजारा हे नाव अन्य असे अरबी, फारसी, लोकांनी यांना दिले आहे. हे आपआपसात बंजारा नाहीतर गोरमाटी नावाने परिचित असतात. परंतु संस्कृत मध्ये गो म्हणजेच गाय-बैल यांची राखण करणारे यांना पाळणारे म्हणजेच गोर समजले गेले. पुढे यांचे वंशजांनी गोत्र हे नाव धारण केले. “आदि भारत” पृष्ठ नं.६५,६६ श्रीपाद डांगे गोरमाटी,गोर-माणसाची बोली म्हणजेच गोर बोली. माटी-म्हणजे मनुष्य , माझी मातृभाषा गोर-बोली बंजारा बोली आहे. “बंजारा बोली”डॉ इब्राईम ग्रिर्यसन आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथात पहिल्यांदा बंजारा, लंबाडा, बोलीचा उल्लेख केला आहे. “स्वतंत्र भारतातील जाती तथा भाषांची समस्या”- बोरीस क्लूयेव अनु. नरेश बेदी पृष्ठ ५९ उत्तर दक्षिण भारतात बोलली जाणारी बंजारा, लंबाडी, बोलणाऱ्यांची संख्या १२७२०१६ इतकी आहे. डॉ इब्राईम ग्रिर्यसन च्या नंतर डॉ.गणेश देवी या भाषा संरंक्षण करत आहेत ज्यामुळे भारताची जिवीत बोलभाषेची संख्या समोर येऊ शकेल. कोणत्याही बोली भाषेचा अभ्यास करण्यासाठी भुगोल आणि मानवाचा वंशज याचे ज्ञान असणे जरुरीचे आहे. बंजारा बोली भाषेचा प्रकृति पाणी, वायु यांचा आधार घेऊन व संस्कृतीच्या अभ्यासातुन माहीती मिळते कि, बंजारे मुलस्थान गोर स्थान, गोरबंद नदी तथा गोर डोंगराळ म्हणजेच सिंधु घाटी सभ्यता यांचा भूभाग आहे. रक्त,नाक,कपाळ व हाडांची मापे यावरुन असा निष्कर्ष निघतो की, बंजारा गोर वंशी प्रायः आर्य आहे. बंजारा बोलीचे मुळ रुप ध्वनी विज्ञान स्वरांचे वर्गीकरण रुप विज्ञानन व्याकरण अर्थ विज्ञान, पारीवारीक वर्गीकरण आम्ही पाहातो. बंजाराबोली ही आर्य बोली तसेच मुळ भारोपीय भाषा परिवाराची बोली आहे. तात्पर्य बंजारा जमात काही शतकांपुर्वीपासुन काही भूभागावर वसलेली आहे. ज्या कारणास्तव त्यांची आपल्या कबील्या (समुह) मध्ये अंतर्गत व्यवहार बोलाचाली साठी ज्या बोलीचा उगम झाला ती बंजारा बोली आहे.
भाषा वेज्ञानीक मानतात की जगात सात हजार भाषा जीवंत आहेत. आज भारतात २२ भाषांना मान्यता आहे.२००१ च्या जनगणनेच्या आधारावर १२२ भाषा प्रचलीत आहेत. तर आपल्या देशात मातृभाषेची संख्या १६५२ मानली जाते. “बंजारा बोलीचे विभाजन ” देशातील सोळा प्रांतात बंजारांचे तांडे अधिक प्रमाणात दिसुन येतात. बंजारा बोली व त्यावर राजभाषेचा परिणाम च्या अभ्यासासाठी मोठया प्रमाणावर विभाजन करु शकतो. एक उत्तर मध्य भारत ज्यामध्ये पंजाब, हरियाना, दिल्ली, -ाारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र (आर्यभाषा) दक्षिण भारतामध्ये आंध्र, कर्नाटक, गोवा, आणी उत्तर तामीळनाडू – (द्रविड भाषा प्रांत) विदेशामध्ये पाकीस्तान, सिंध, बलुचीस्थान,अफगानीस्थानामध्ये बंजारा बोली बोलली जाते. मी जवळजवळ सगळया प्रांतातील बंजारा लोकांना तीथे जाऊन त्यांची भेट घेतली आहे. व मला असा अनुभव आला आहे की, बंजारा बोलीवर स्थानिक तसेच राजभाषेचा परिणाम -ााल्यामुळे बंजारा बोली स्वरुपाची बोली दिसुन येते. भारत-महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा, उत्तर तामीळनाडू मध्ये बंजारा बोलीवर सामान्यतः दहा टक्के परिणाम स्थानिक भाषेचा झाला आहे. नव्वद टक्के मूळ बंजारा बोली आणि लोकसाहित्य इथे आजही सुरक्षीत आहे. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, पुर्व गुजराथ आणि दक्षिण राजस्थान मध्ये बंजारा बोलीवर २० टक्के परिणाम झालेला असुनही बंजारा ८० टक्के बंजारा बोली व त्यांचे लोक साहित्य जीवंत आहे. पंजाब हरियाना उत्तर राजस्थान, पश्चिम गुजराथ मध्ये बंजारा बोली तांडयावर आजही बोलली जाते. तर शहरात राहणारे बंजारा बोलीवर गुजराथी,राजस्थानी भाषेचा परिणाम जास्त झाल्यामुळे मुळ बंजारा बोली मिश्रीत स्वरुपात इथले लोक बोलतात दिसुन येते. पंजाब हरियाना दिल्ली, ओरीसा ग्रामीण भागात बंजारा बोली बोलली जाते तर शहरात व महानगरामध्ये वसलेले बंजारे,बंजारा बोली समजतात पण स्पष्टपणे बोलु शकत नाहीत. उत्तर भारतामध्ये बंजारा बोली नाममात्र राहीली आहे. नवीन पीढी बंजारा बोली पूर्णतः विसरुत चालली आहे.केवळ जात प्रमाणपत्रावर बंजारा जात लिहीत आहेत. या प्रमाणे एक बंजारा बोली बेल्ट दाखवुन बंजारा बोली ची आजची स्थीती आमच्या समोर स्पष्ट होइल. बंजारा बोली व हिंदी भाषेमध्ये समानता अधिक असल्यामुळे उत्तर भारतामध्ये बंजारा बोली वर हिन्दी भाषा मिश्रीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण भारतामधील भाषा व बंजारा बोली यात विषमता जास्त आहे. त्या कारणास्तव तेथे मुळ बंजारा बोली जिवंत आहे. दक्षिण भारतामध्ये बंजाराबोली दहा टक्के नुसार पूर्णतः जीवित आहे. विशेषतः बंजाराबोली आणि लोकसाहित्यावर खुपमोठे साहित्य लिहीले जात आहे. बंजारा बोलीची आपली कोणतीही लीपी नसल्या कारणाने दक्षिण भारतामध्ये तेलगु तामिळ, कन्नड आणि मराठी लिपी मध्ये बंजारा साहित्य लिहीले जात आहे. महाराष्ट्रात बंजारा लिपी ही देवनागरी भाषेत लिहीली जात आहे. आतापर्यंत लिहीलेले मासिक पत्र, पत्रिका बंजारा बोली कुठे चालते तर कुठे ती बंद झालेली आहे. त्याच प्रमाणे बंजारा बोलीमध्ये आतापर्यंत दक्षिण भारतामध्ये लहान मोठी आठ ते दहा चित्रपट निर्माण झालेले आहेत.त्याच प्रमाणे दक्षिण भारतामध्ये बंजारा बोली स्थानिक भाषेतील बरेचशे शब्द आपल्या बोलीमध्ये आणुन एक प्रकारे बंजारा बोली समृध्द करण्याचा प्रयत्न दक्षिण भारतात होत आहे. बंजारा बोली आणि तिचे साहित्य अन्य भाषेचा परिणाम होऊन सुध्दा आपल्या वेगळया बोलीच्या रुपात आपली स्वतंत्र ओळख दक्षिण भारतातील बंजारा बोलीत आढळुन येते.
“बंजारा बोलीचे रुप-स्वरुप” बंजारा बोलीवर भाषा विज्ञान तथा भाषाशास्त्र च्या खोलातुन अभ्यास झालेला नाही. बंजारा लोकसाहित्यावर अनुसंधानात्मक अभ्यास चालु आहे. परंतु बोलीवर शेाधकार्य म्हणावे तसे झालेले पहावयास मिळत नाही. डॉ.नेमीचंद जैन ने भीली का भाषा शास्त्रीय अध्ययन ज्या आवडीने केले आहे ते एक आदर्श भारतीय बोलीचा अध्ययन ग्रंथ आहे. याच ग्रंथाला आदर्शग्रंथ मानुन बंजारा बोलीचे अध्ययन या प्रमाणेच होणे जरुरीचे आहे. बंजारा लिपी जरी नसली तरी आज दोन करोड च्या जवळपास बंजाऱ्यांच्या कष्टातुन ती सुरक्षीत बोली आहे. बंजारा बोलीचे स्वरुप पाहुन माहीत पडते की, इंडो-आर्यन बोलींमधील बंजारा एक प्राचीन बोली आहे.ही आजपर्यंत बदलत्या रुपामध्ये पण जीवित आहे.याचे महत्वपुर्ण कारण म्हणजे अन्य समाजापासुन काही शतकांपासुन बंजारा तांडा दुर रहात आहे. आपण भले व आपला तांडा भला यामुळे नागरी भाषा समाजापासुन दुर राहील्यामुळे ती प्रवाहीत होत आली आहे. तसे या जमातीतील तांडे लदेणी व्यापारासाठी अठराव्या शतकापर्यंत देश-विदेशामध्ये फिरत राहीले ज्या मुळे देशी-विदेशी शब्द पण बंजारा बोलीत दिसुन येतात.
बंजारा मातृबोलीला जीवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते बंजारा माता भगीनींनी बंजारा स्त्री ही आता-आता पर्यंत सुध्दा अन्य कोणत्याही भाषेच्या व्यक्ती सोबत बंजारा बोली मध्येच बोलते. बाजार हाट (बाजार) करतांना ती बंजारा बोलीचाच वापर करते, ज्या मुळे लाभ तर झाला आणि हानी ही झाली की, जात लपवण्याची प्रवृत्ती काही अददीपर्यंत बंजारांमध्ये निर्माण झाली. आपली जात ओळखु येऊ नाही म्हणुन बंजारा बोलीमध्ये सार्वजनीक रुपात बंजारा लिहीता वाचता येणारा माणुस पण एका वेळी घाबरत होता. त्याचे दुसरे एक कारण म्हणजे बंजारा जात इ.स.१८७१ च्या गुन्हेगार, जमाती मध्ये कायदयाने जन्मजात जरामपैशा जाती घोषीत केली होती. बोलण्यावरुन जात ओळखली जाते. पोलीस येऊन पकडुन नेतील या कारणामुळे सुध्दा बंजारा बोलीत बोलण्यासाठी बंजारा लोक घाबरत.
बंजारांची देशात तत्सम तथा उप जाती पण विभिन्न धंदा, व्यवसायाच्या कारणामुळे सुध्दा बोलीच्या उपबोलीय समजली जाते जसे ढाढी,ढालीया, लभान,सनार,नाव्ही, जोगी,नट बामधिया, बाजीगर, कांगसी, सुगाली, गंवारीया, लमाणी,लदेणिया, सारखी बंजारा आदि भाषांसोबत बंजारांनी धर्मांन्तर केले जसे शिख गुरुमुखी, परिणाम इसाई, अॅग्रेजी परिणाम तो मुस्लीम ऊर्दु चा परिणाम बंजारा बोलीत दिसुन येतो. याच्या बरोबर बंजारा बोली मध्ये (आपले आपण जातभाई समजतात) त्यामुळे गुप्त बोलीचे काही शब्द व वाक्याचा प्रयोग पण ते करतात. ज्याला फारसी बोली म्हटले जाते. अन्य भाषेचा आवाज मिलावटी उच्चारण पध्दतीचा परिणाम बंजारा बोलीवर झाला आहे. परंतु अर्थ बदलला नाही.”भाषा अभ्यासक आणी बंजारा बोली” डॉ. गिर्यसन आपल्या भाषा सर्वेक्षण ग्रंथामध्ये बंजारा लमाणी भ्रमणशील बोली असे म्हटले आहे. ज्यामुळे ते राजस्थानी बोलीचे पश्चिमी रुप मानले जाते. पृष्ठ क्र. ३१८ भाषा सर्वेंक्षण अनु डॉ.उदय नारायण तिवारी तो डॉ.प्रेम प्रकाश रस्तोगी बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात ज्यांची जन संख्या १५८५०० पृष्ठ ११४ भाषा विज्ञान डॉ.देवेन्द्र कुमार शास्त्री आपल्या भाषा शास्त्र आणि हिन्दी भाषा की रुपरेखा नावाच्या ग्रंथामध्ये जिसाफददीन अहमद बंजारा बोलीचा उल्लेख करतात पृष्ठ क्र. १३४ डॉ. भोलानाथ विवारी बंजारा बोलीला पंजाबी मिश्रीत एक बोली मनतात.पृष्ठ १४० भाषा विज्ञान शब्द कोष डॉ. राजेंद्र व्दिवेदी आपल्या भाषा विज्ञान ग्रंथात लंबाडी बोलणारांची संख्या ३,३२,९१७ पृष्ठ ७८५ राजस्थानी भाषा के अध्येता डॉ.सिताराम लालस प.राजस्थानी हिन्दी लभ्भानी बोली चा संदर्भ देतात. पृष्ठ १५ हिरालाल शुक्ल आपल्या जनभाषा और साहित्य नामक ग्रंथामध्ये आर्यभाषा सामुहीक परिवाराची बोली मानतात. पृष्ठ १४० घुम्मकड शास्त्र चे लेखक राहुल सांकृतांयन बंजारा बोलीला राजस्थानी बोली मानतात. पृष्ठ क्र.४६ आज बंजारा बोलणा-यांची संख्या देश-विदेशात पाच करोडच्या जवळपास असुनही भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. बंजाराबोली विकासासाठी देवनागरी लिपीमध्ये पाठयपुस्तके तयार करावयास हवे, ज्या मुळे बंजारा बोलीचा विकास होऊ शकेल. भाषेचा दर्जा प्राप्त होईल व शासकीय सहयोगामुळे बंजारा भाषा फलती-फुलती राहील. तीचे अस्तीत्व जास्त काळ टिकुन राहील. घुम्मकड च्या कारणामुळे ती व्दिभाषीय बनली आहे. शासकीय आधार मिळाला तर बंजारा बोलीला अंतर्गत व्यवहारात गौण रुप प्राप्त होणार नाही. बंजारा बोलणाऱ्यांच्या संखेत वाढ होत राहील.
संत कबीरांनी म्हटले आहे संस्कृत कुपजल भासा बहता नीर त्याच प्रमाणे ४ कोसपर पानी बदले दस कोस पर बानी. बंजारा घुम्मकड असल्याने भारतीय बोली भाषेचा परीणाम बंजारा बोलीवर दिसुन येतो. जसे महाराष्ट्रात मराठी, गुजराथ मध्ये गुजराथी, राजस्थान मध्ये राजस्थानी, मध्य प्रदेशात हिन्दी, कर्नाटकात कानडी, आंध्रात तेलगु, शब्द बंजारा बोलीने ग्रहण केले आहे. आजकाल इंग्रजी शब्दही बंजारा बोलीत येऊ लागले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरुजीनी खरे म्हटले आहे की, भारतातील कथीत शेकडो भाषा आमच्या साठी एक प्रिय विषय आहे. डॉ. गणेश देवी साहित्य अकादेमी या प्रिय विषयावर काम करत आहेत. कोणत्याही जाती जमातीतील पंथ, धर्म संप्रदाय सण-समारंभ रितिरिवाज सामाजिक, सांस्कृतिक , पारिवारीक, संस्कार-सभ्यता आणि संस्कृती समजण्यासाठी व ओळखण्यासाठी त्यांची बोली ही एकमात्र किल्ली आहे. तरीपण धर्मांतरापासुन आपली संस्कृती इतिहास आणि बोलीवर परीणाम झालेला दिसुन येतो.
डॉ.गोवर्धन बंजारा
अहमदाबाद, गुजरात

GOAR WEB CONSULTANT